दुर्दैवी! मुख्यमंत्र्याच्या समोरच शॉक लागून एकाचा मृत्यू; श्रीकांत शिंदेंच्या भाषणावेळी घटना

0
46

मिंधे गटात गेलेले माजी नगरसेवक रमाकांत मढवी यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मिंधे गटाचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंचे भाषण सुरू असतानाच एक दुर्घटना घडली आहे.

मिंधे गटाचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंचे भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांसमोरच शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रामजीयावन विश्वकर्मा असं या मृत व्यक्तीचं नाव असल्याची माहिती मिळते आहे. मिंधे गटाचे माजी नगरसेवक आणि कार्यक्रमाचे आयोजक रमाकांत मडवी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Spread the love