हेमकांत गायकवाड
चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी चि. ध्रुव जगन्नाथ चव्हाण याने शिरपूर येथील मुकेशभाई पटेल मिलिटरी स्कूल येथे आयोजित वादविवाद स्पर्धेत ऑफलाईन शिक्षण की ऑनलाईन शिक्षण उत्तम या विषयाचे उत्कृष्टरित्या सादरीकरण केले व वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे .
. ध्रुवने उत्कृष्टरित्या सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल त्याचे अभिनंदन पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले , संचालक भैय्यासाहेब पंकज बोरोले , प्राचार्य मिलिंद पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.
ध्रुवने आपला विषय सादरीकरण करतांना , ऑनलाईन + ऑफलाईन = उद्याचे शिक्षण , तसेच शिक्षणाचे महत्वाचे घटक अध्यापन – अध्ययन – मूल्यमापन , सध्याची परिस्थिती , ऑनलाईन शिक्षणाचे फायदे , ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा , शासनाची भूमिका – उपक्रम आणि धोरणे , समिंश्र शिक्षण हिच भविष्याची दिशा …. आदि मुद्द्यांद्वारे आपला विषय उत्तमरित्या सादरीकरण केला व प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
ध्रुव यास त्याचे वर्गशिक्षक महेंद्र पानपाटील यांचे मार्गदर्शन लाभले . ध्रुव हा तावसे बुद्रुक येथील डॉ जे डी चव्हाण यांचा चिरंजीव आहे…