दिपक सोनार शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित                  

0
17

रावेर – जिनियस मास्टर्स फाउंडेशन जामनेर तर्फे आयोजित शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा जि प शाळा वाकी रोड जामनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा ना गिरीशभाऊ महाजन उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी नगरसेवक मा.डॉक्टर प्रशांतजी भोंडे हे होते.या प्रसंगी जि. प. मराठी शाळा विवरे खुर्द ता रावेर येथील पदवीधर शिक्षक तथा विवरे केंद्र प्रमुख दिपक सोनार यांना शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्यात जळगांव जिल्यातील प्रत्येक तालुक्यातून एक आदर्श शिक्षक तसेच जामनेर तालुक्यातील आदर्श शिक्षक व पोलिस, महसुल, कृषी व आरोग्य विभागातील गुणवंतांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी फाउंडेशनचे मार्गदर्शक अमर भाऊ पाटील ,अध्यक्ष रमेश कांतीलाल पाटील संचालक मंडळाचे गिरीश भाऊंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आदरणीय नामदार श्री.गिरीश महाजन यांनी जिनियस मास्टर्स फाउंडेशन जामनेर च्या कार्याचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, उपशिक्षणाधिकारी मा एन एफ चौधरी साहेब, विस्तार अधिकारी मा विजय सरोदे साहेब,ग स सोसायटीचे अध्यक्ष उदय बापू पाटील, उपाध्यक्ष रवींद्रजी सोनवणे, माजी अध्यक्ष मनोजजी पाटील, अनिल गायकवाड, अजबसिंग पाटील, विनोद पाटील, योगेश इंगळे, कृष्णाजी सटाले, पारोळा सोसायटीचे संचालक, डॉ. नांदलाल पाटील, डॉ संदीप पाटील,तालुक्यातील केंद्रप्रमुख शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते. कृषी विभागाचे सुनील गायकवाड,शिक्षण विभाग श्री एन एफ चौधरी साहेब श्रीमती. शारदा शिंपी, श्री दिपक सोनार यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित सर्व संघटना,शिक्षक मित्र परिवाराचे अनमोल असे सहकार्य मिळाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत पाटील, राहुल महाजन, नामदेव पाटोळे यांनी केले आभार जनार्दन लोखंडे यांनी मानले.

Spread the love