जळगाव : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडप्रकरणी अटकेत असलेल्या चार व्यक्तींपैकी तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी त्यांची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी दिली.
मुक्ताईनगर येथील कोथळी या ठिकाणी मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची यात्रेत सात जणांनी छेडछाड केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ चार आरोपींना अटक केली होती. यामध्ये एक अल्पवयीन असून, तीन आरोपींना ५ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली होती. संशयितांना न्यायालयात दुपारी हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. त्यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये रवाना करण्यात आलेले आहेत, तर उर्वरित तीन संशयितांच्या शोधासाठी पोलिसांचे तीन पथक राज्याबाहेर गेले आहेत.