दिल्ली सुप्रिया सुळेंनी सांभाळावी आणि राज्य अजित पवारांनी सांभाळावे

0
40

मुंबई – राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा मंगळवारी केली. यानंतर राज्याच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणात जबरदस्त खळबळ उडाली. शरद पवार हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर पुढे पक्षाचे नेतृत्व कोण करणार याची राजकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करतानाच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी समितीही जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पुढचे नेतृत्व कसे असावे असे विचारले असता त्यांनी नेतृत्वाची विभागणी केली जावी आणि एका नेतृत्वाने दिल्ली सांभाळावी आणि दुसऱ्या नेतृत्वाने राज्य सांभाळावे असे मत व्यक्त केले.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना नेतृत्वाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले की, माझं स्वत:चं मत आहे की शरद पवारांनीच अध्यक्षपदाचे काम पाहायला हवं. अन्यथा राज्याचं काम अजित पवारांनी सांभाळावं आणि दिल्लीतील काम सुप्रिया सुळेंनी पाहावं. भुजबळ यांनी हे बोलत असतानाच सगळ्या नेत्यांचे अजूनही शरद पवार यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले, ते म्हणाले की, “शरद पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. तुम्ही आमच्यापेक्षा दसपट काम करता. तुमचा दिनक्रम पाहिला तर डायरी भरलेली असते. भेटीची वेळ मिळणं कठीण होईल एवढे कार्यक्रम लागलेले असतात. त्यांनी काहीतरी विचार केला असेल. ते काय विचार करतात हे त्यांच्या घरच्यांनाही कळत नाही. त्यांनी हा निर्णय का घेतला हे लोक माझा सांगातीची तिसरी आवृत्ती येईल त्यात ते कदाचित लिहितील.”

Spread the love