चोपडा (प्रतिनिधी):- तालुक्यातील खेडीभोकरी व भोकर दरम्यान तापी नदीवर दरवर्षी हंगामी लाकडी पूल बनवण्यात येत असतो. हा पुल १ जानेवारी पासून ३१ मे पर्यंत रहदारीसाठी खुला असतो. मागील वर्षी हा पूल बनवण्यात आलेला नव्हता. त्याबाबत गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी संबंधित विभागाकडे निवेदनही दिलेले होते. व त्याआशयाच्या बातम्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या होत्या. संबंधित विभागाने त्याची दखल घेऊन नदीत दोन सिमेंटचे पाईप टाकून त्यावर मातीरेतीचा भराव करून तात्पुरता कच्चा रस्ता तयार केलेला होता. परंतु नदीत पाण्याचे आवर्तन सुटल्याने हा कच्चा रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे वाहनधारक व प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागला होता. सद्यस्थितीत याठिकाणी नाव (होडी) वर वाहनांसह प्रवाशांना दोन्ही काठांवर पोहोचवितांना नावाडी बांधवांना पाण्यावरची कसरत करावी लागत असुन त्यात बसणाऱ्या प्रवाशांना आपला जीव मुठित धरून जावे लागत आहे. “नवीन पक्का पुल होईल तेव्हा होईल, तोपर्यंत याठिकाणी सालाबादप्रमाणे हंगामी लाकडी पुल बनविण्यात यावा”, अशी आग्रही मागणी गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केलेली आहे.
https://youtu.be/V0OQ1HB9SjQ
विदगावच्या पुलावर ग्रामस्थं रास्तारोको करणार..
दि.१ जाने.२०२३ पासुन भोकरचा हंगामी पुल रहदारीस सुरू झाला पाहिजे, परंतु अजुनही येथे संबंधित विभागातर्फे लाकडी पूल बनविण्याची कार्यवाही होताना दिसत नाही. हा पुल लवकर बनवावा, अन्यथा भोकरच्या लाकडी पुलासाठी विदगावच्या पक्का पुलावर पंचक्रोशितील ग्रामस्थांतर्फे रितसर तीव्र रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहिल.
जगन्नाथ बाविस्कर, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ता.चोपडा.