प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे अनेक ठिकाणी विज खांबावरील लाईट गेलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे श्री हनुमान मंदिर परिसरात अंधार आहे. तसेच स्मशानभूमीच्या मार्गावर असलेल्या महिला शौचालयाच्या परिसरात अंधार आहे. तसेच याच भागातील पुरुषांच्या शौचालयाच्या परिसरात ही अंधार आहे. जिल्हा परिषद मराठी शाळेकडील परिसरात ही महिला शौचालयाच्या परिसरात अंधार आहे. तसेच गावात ठिकठिकाणी लाईट गेलेले आहे. विशेष म्हणजे सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. तसेच दसरा सण जवळ आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर एक दोन दिवसात ज्या ज्या ठिकाणी लाईट गेलेले असतील. त्या ठिकाणी लाईट लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.