पंतप्रधान मोदींचे आक्षेपार्ह फोटो, साध्वी प्राचींनी केली अटक करण्याची मागणी; ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड

0
17

पंतप्रधान मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांनी पंतप्रधानांचे आदरातिथ्य केले. मात्र, या दरम्यान पत्रकार रवी नायर यांनी पंतप्रधानांचे काही आक्षेपार्ह फोटो ट्विट केले आहेत.

हे फोटो फेक असल्याचा आरोप करत, नायर यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.

हे डिलीट होणार नाही

रवी नायर यांनी पंतप्रधान मोदींचे काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो आपण डिलीट करणार नसल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट पोस्ट करत डॉ. प्राची साध्वी यांनी रवी यांना तात्काळ अटक करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

फेक असल्याचं सिद्ध करा

प्राची यांच्या ट्विटला उत्तर देत, रवी नायर यांनी त्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. “हाय प्राची (मला तुमचं खरं नाव माहिती नाही), मात्र हे फोटो खोटे आणि फोटोशॉप असल्याचं सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही जर हे सिद्ध केलं तर मी नक्कीच माझं ट्विट डिलीट करेल. माझं तुम्हाला हे खुलं चॅलेंज आहे. कृपया हे स्वीकारा.” अशा आशयाचं ट्विट रवी नायर यांनी केलं आहे.

ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड

या सर्व प्रकारानंतर ट्विटरवर #ArrestRaviNair हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगट्या १७ हजारांहून अधिक पोस्ट समोर आल्या आहेत. यातील बहुतांश ट्विटच्या माध्यमातून रवी नायर यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

यापूर्वीही वादात

वादात अडकण्याची रवी नायर यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील भाजप आणि अदानी यांच्यामधील आर्थिक व्यवहारांबाबत काही लेख लिहिले होते. अदानी समुहाने आपली बदनामी केल्याबद्दल रवी यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं.

Spread the love