प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था झालेली असून काटेरी झुडपे वाढल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे विशेष म्हणजे ज्या ठिकाणी पाणी दिले जाते त्या ठिकाणी सुध्दा मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे स्मशानभूमीत अंत्ययात्रेत बाहेर गावाहून नागरिक आलेले असतात सुनसगाव येथील स्मशानभूमीची परिस्थिती पाहून अनेक वेळा चर्चेला उधाण येते मग ग्रामपंचायत व पदाधिकाऱ्यांचा उध्दार केला जातो. या अगोदर स्मशानभूमीच्या रस्त्याची दयनीय अवस्था होती दै देशदूत मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासक व ग्रामसेविका यांनी तातडीने कार्यवाही केली आणि जेसीबी मशीन ने रस्ता मोकळा केला. आता स्मशानभूमीत काटेरी झुडपे निर्माण झाली आहेत ती काढण्यात यावी. अशी मागणी सुज्ञ ग्रामस्थांनी केली आहे.