देवीच्या प्रसादात आढळली धक्कादायक गोष्ट! सप्तशृंगी गडावर एफडीएची मोठी कारवाई

0
45

नाशिक : प्रसिद्ध बँडच्या मसाल्यांमध्ये कन्सर होणारे घटक सापडल्याने काही देशात यावर बंदी घालण्यात आली आहे. ही घटना ताजी असतानाच आता सप्तशृंगी गडावर थेट प्रसादामध्येच भेसळ सापडल्याने खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने गडावर जात प्रसादांच्या दुकानांची तपासणी करत पेढा विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईत 2000 किलो बनावट मावा पेडा मिठाई जप्त करण्यात आली आहे.

राज्यभरातून भाविक सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. सप्तश्रृंगी गड  वणी या ठिकाणी वर्षभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्याठिकाणी लोक प्रसाद म्हणून पेढे, कलाकंद इत्यादींची खरेदी करतात. त्यामुळे भाविकांना दर्जेदार अन्नपदार्थ मिळण्याकरिता अन्न व औषध प्रशासन नेहमीच तत्परतेने कार्यरत असते. त्याचाच भाग म्हणून प्रशासनामार्फत सप्तश्रृंगी गडावर तपासणी मोहिम राबविण्यात येवून आली. यात पेढे विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

मावा पेढ्याच्या नावाखाली बर्फी विक्री करणाऱ्या पाच दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईत 2000 किलो बनावट मावा पेडा मिठाई जप्त करण्यात आली आहे. जवळपास सहा लाख रुपयांची बनावट मिठाई नष्ट केली जाणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाने नाशिकच्या सप्तशृंगी गडावर मोठी कारवाई केली आहे.

यापूर्वीही झाली होती कारवाई

मागच्या वर्षी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाने सप्तशृंगी गडावरील 10 पेढा विक्रेत्यांवर कारवाई केली होती. त्यावेळी 10 पेढा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली होती. या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी साठविल्याचे आढळून आले. परंतु त्यावर कुठल्याही प्रकारचे अंतिम टिकण्याची क्षमता  याबाबतचे टॅग नसल्याचे आढळले. तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या स्वच्छतेविषयक बाबींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले होते.

 

Spread the love