धानुका मार्फत कृषी मित्रांना मार्गदर्शन संपन्न.

0
7

प्रतिनिधी जितेंद्र काटे

भुसावळ – जळगाव येथील वाणी समाज मंगल कार्यालयात दि. 26/06/2025 रोजी धानुका अग्रिटेक लिमिटेड.या कृषी क्षेत्रातील आग्रगण्य कंपनी तर्फे धानुका कृषी मित्रांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.या चर्चासत्राला जिल्ह्यातील सर्व धानुका कृषी मित्र हजर होते. या कार्यक्रमाला कंपनीचे डेपोडी जनरल मॅनेजर मिस्टर दीपक नरवाडकर सर , कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ हेमंत बाहेती सर , एरिया सेल्स मॅनेजर कपिल वडजे सर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या चर्चा सत्रात १८० शेतकरी कृषी मित्र उपस्थित होते. यावेळी महागाईच्या काळात शेतकरी कर्जबाजारी न होता जास्तीचा हंगाम शेतकऱ्याला कसा घेता येईल यावर सुध्दा चर्चा करण्यात आली तसेच नकली औषधापासून सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले. धानुका कंपनीच्या प्रत्येक उत्पादकाची माहिती यावेळी शेतकऱ्यांना दिली.यावेळी शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले असता समाधान कारक उत्तरे देऊन शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी मोहित खडके (BDO) निंबाजी वसु (SO) यशवंत ताडे, जळगाव व सहकार्यांनी परिश्रम घेतले.

Spread the love