धनुष्यबाण’ आता डोहाळे जेवणासाठी भाड्याने द्या.

0
9

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला गळती लागली असून शिंदे गटाने शिवसेनेला सळो की पळो करुन सोडले आहे. यात आता मनसेनेही शिवसेनेवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. मनसे सरचिटणीस शालीनी ठाकरे यांनी ‘धनुष्यबाण’ आता डोहाळे जेवणासाठी भाड्याने द्या, असे सूचक ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.

‘रेल्वे इंजिन भाड्याने द्या म्हणुन उपदेश देणार्‍यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे’, अशा आशयांचे ट्विट करत शालीनी ठाकरे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ देण्याची मागणी केली आहे. तर मूळ शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण हा आपल्याकडेच राहील, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिंदे गट आणि उद्धव गटात ‘धनुष्यबाण’ वरुन जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना आणि ‘धनुष्यबाण’ नेमके कोणाचे या अवघ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नावर अनेक कायदेतज्ज्ञ आपापल्या परीने उत्तरं शोधत आहेत.

Spread the love