धरणगाव बाजार समिती निवडणूक निकाल : महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष,

0
12

धरणगाव -: येथील बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड चुरस बघायला मिळत आहे.

ग्रामपंचायत मतदार संघातील महायुतीचे ‘सहकार’ पॅनलचे ३ उमेदवार तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी झाल्याचे कळते.

सोसायटी मतदार संघात मात्र, महाविकास आघाडीचे आणि महायुतीमध्ये प्रचंड चुरस बघायला मिळत आहे.

धरणगाव बाजार समितीची निवडणुक मोठ्या चुरशीची झाली होती. आज सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिला निकाल हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बाजूने लागला. हमाल-मापाडी मतदारसंघातील ‘सहकार’ पॅनलचे ज्ञानेश्वर वसंत माळी हे विजयी झाले आहेत.

सोसायटी मतदार संघात मात्र, महाविकास आघाडीचे आणि महायुतीमध्ये प्रचंड चुरस असून अवघ्या काही मतांनी दोन्हीकडचे उमेदवार मागेपुढे आहेत. एरंडोलकडील मतपेटीवर आता निकाल अवलंबून आहे.

ग्रामपंचायतमध्ये मविआची एक जागा तर महायुती तीन विजयी तर सोसायटीमध्ये (जनरल) ४ महायुती, ३ महाविकास आघाडीचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे कळते. दोन महिला राखीवचा निकाल अजुन बाकी आहे.

Spread the love