
धरणगाव प्रतिनिधी: दि.९ मार्च, २०२२ बुधवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापनदिन धरणगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला. तत्पुर्वी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या महापुरुषांच्या स्मारकास माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर धरणगाव ग्रामीण रुग्णालय, जीवन शिक्षण विद्यालय क्र.१, त्याचप्रमाणे माऊली वारकरी शिक्षण संस्था येथे फळं वाटप करून माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा, १००८ महामंडलेश्वर हभप भगवानदासजी महाराज यांचे मनसेच्या कार्यकर्त्यांनी आशीर्वाद घेतले. कार्यक्रम प्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष रविंद्र महाजन, तालुका सचिव राजू बाविस्कर, तालुका उपाध्यक्ष कृष्णा पाटील, शहराध्यक्ष संदीप फुलझाडे, विकास पारधी, मोनू चव्हाण, गोलू चौधरी, गणेश महाजन, शुभम पारधी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.












