मजाक, मस्करीचा राग येवून शाहरूखसह सलमानला बेदम मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शाहरूख युसुफ पठाण (वय 22 रा. लक्ष्मीनगर,धुळे) याच्या फिर्यादीनुसार, तो रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास परिसरातील राहुल येवले याच्या टपरीवर पुढी घेण्यासाठी गेला होता. तेव्हा शाहरूख व राहुलशी मजाक, मस्करी सुरू होती. त्याचा कुणाल यास राग आला. त्याने मला शिवीगाळ केली, असे समज करून घेतला. तेव्हा शाहरूख याने यात तुझा काही संंबंध नाही, आपल्या काहीएक वाद नसल्याचे सांगितले.
त्यानंतर काही वेळाने अचानक नानु गवळी, लखन नेरकर व कुणाल गवळी या तिघांनी येवून शाहरूख यास लाकडी दांडक्याने व हाताबुक्यांनी मारहाण दोन दात पाडले. गुडघ्याला दगड मारून जखमी केले. तसेच त्याचा भाऊ सलमान याला देखील मारहाण केली. पुढील तपास पोहेकाँ वसावे करीत आहेत.












