प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील दिपनगर निंभोरा येथे मारहाणी व पैसे हिसकवून घेतल्याची घटना घडल्याने भुसावळ तालुका पो. स्टे. ला गुरनं 178/2025 BNS कलम 309(6), 118(1), 115(2), 352, 351(3), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या बाबत फिर्यादी शेख अशफाक शेख सगीर, वय 33 वर्ष, व्यवसाय – सुपरवायझर, रा. ग्रीन पार्क गल्ली नंबर 2, खडका रोड, भुसावळ यांनी फिर्याद दिली असून
आरोपी 1)दिपक मधुकर हातोले, 2) किरण मधुकर हातोले, 3) दिनेश त्र्यंबक खंडारे सर्व रा. निंभोरा, ता. भुसावळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दि.07/09/2025 रोजी दुपारी 05:00 वाजेचे सुमारास भुसावळ औष्णीक विद्युत केंद्र दिपनगर 560 MW प्रकल्प गेट समोर हायवेचे पलीकडे रोडचे बाजुस सार्वजनिक जागे ठिकाणी ही घटना घडली असून
5,200/- रुपये रोख त्यात 500/- रुपये दराच्या 10 नोटा व 100/- रुपये दराच्या दोन नोटा असे पैसे संशयीत आरोपी यांनी संगनमत करुन फिर्यादी यांची अत्रैय कंपनी नाशिक यांनी फ्लॅश (कोरडी राख) चे कंत्राट का घेतले व फिर्यादी यांची कंपनी बल्कर द्वारे फ्लॅश (कोरडी राख) वाहतुक का करीत आहे असे बोलण्याचे वाईट वाटुन आरोपी याने फिर्यादीला तोंडावर तसेच डोक्यावर उजव्या बाजुस रॉडने व फाईटने मारुन दुखापत केली. तसेच फिर्यादी सोबत असलेले अब्दुल अदनान अब्दुल रहेमान कुरेशी याचे उजव्या पायाचे मांडीवर रॉडने मारुन व अमर बहादुर सिंह सुर्यबली सिंह यास त्या तिघे आरोपीतांनी तोंडावर फाईटने व चापटा बुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन दमदाटी करुन किरण मधुकर हातोले याने फिर्यादी याच्या खिशातील रोख 5,200/- रुपये बळजबरीने हिसकावुन घेवुन फिर्यादी व साक्षीदार यांना सदर ठिकाणाहुन हाकलुन दिले. म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तपास पोनि महेश गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनि पुजा अंधारे करीत आहेत.