दिपनगर जवळ मोटरसायकलच्या धडकेत एक ठार !

0
27

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील दिपनगर गेट जवळ अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या बाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी अल्तमश नवाब खाटीक, वय 26 वर्ष, व्यवसाय – खाटीक, रा. प्रतीभा नगर,  वरणगाव,ता. भुसावळ यांनी फिर्याद दिली असून  आरोपी बबलु रमेश भागेश्वर, रा. वाघनगर जळगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात  दि. 12/09/2025 रोजी 13:45 वाजेचे सुमारास फेकरी ते वरणगाव जुना हायवे रोडवर 210 MW दिपनगर चे महाराष्ट्र चिकन व मटण सेंटरचे समोर रोडवर सार्वजनिक जागी घडला असून अपघातातील मयताचे नाव हुजेफ रऊफ खाटीक वय 19 रा. कोळीवाडा – खाटीक वाडा, वरणगाव, ता. भुसावळ आहे.फिर्यादी यांनी फिर्याद दिली आहे की दि. 12/09/2025 रोजी 13.45 वाजेचे सुमारास फेकरी ते वरणगाव जुना हायवे रोडवर 210 MW दिपनगर चे महाराष्ट्र चिकन व मटण सेंटरचे समोर रोडवर सार्वजनिक जागी फिर्यादी व हुजेफ रऊफ खाटीक असे नमाज पठण करण्यासाठी त्यांचे दुकानापासुन रस्त्याने त्यांचे साईडने निंभोरा गावाकडे जात असतांना, फेकरी गावाकडुन निंभोरागावाकडे जाणारा बबलु रमेश भागेश्वर, रा. वाघनगर जळगाव हा त्याचे ताब्यातील बजाज कंपनीची प्लॅटिना मॉडेलची लाल काळ्या रंगाची मोटार सायकल क्रमांक MH 19 ER 9526 यावर डबलसीट महेश विजय चौधरी, रा. सुभाष नगर, भुसावळ यास बसवुन, मोटार सायकल बेदरकारपणे व निष्काळजीपणे, भरधाव वेगात, रस्त्याचे परीस्थितीकडे व रहदारीकडे दुर्लक्ष करुन फिर्यादी व हुजेफ खाटीक रोडवर पायी चालत आहे असे त्यांस दिसत असून देखील त्याने त्याची मोटार सायकलची धडक त्यांना लागली तर त्यांचे जिवाचे बरे वाईट होईल हे माहिती असताना देखील त्याने त्याचे ताब्यातील मोटार सायकल जोरात चालवून हुजेफ रऊफ खाटीक यांस पाठीमागून जोरदार धडक मारल्याने त्यात झालेल्या गंभिर दुखापतीमुळे हुजेफ रऊफ खाटीक हा मयत झालेला आहे. त्याचे मरणास व सदर मोटार अपघातास बबलु रमेश भागेश्वर, रा. वाघनगर जळगाव हाच जबाबदार आहे.

त्याचेच चुकीमुळे सदरचा अपघात झालेला आहे. वगैरे म च्या तक्रार वरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.

Spread the love