दिपनगर येथे उमेद ग्रामिण जिवनज्योती योजनेत महिलांना मंत्र्यांच्या हस्ते साहित्य वाटप .

0
27

प्रतिनिधी जितेंद्र काटे 

भुसावळ – मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री भारत सरकार तसेच मा.ना.संजय भाऊ सावकारे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आज दिनांक 2 जून 2025 रोजी,उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान महिला प्रभाग संघ हातनूर तळवेल प्रभाग तालुका भुसावळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने बोरोले लॉन्स दीपनगर या ठिकाणी आयोजित कार्यक्रमामध्ये महिला बचत गटांना (आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजने अंतर्गत)मालवाहू गाडी, तसेच शेती अवजार बँक योजने अंतर्गत ट्रॅक्टर व शेती अवजारे तसेच 24.60 लक्ष समुदाय गुंतवणूक निधी बचत गटातील महिलांना वाटप करण्यात आले. यावेळी मा. रजनीताई सावकारे अध्यक्ष प्रतिष्ठा महिला मंडळ भुसावळ, मा.श्री राजेशजी लोखंडे साहेब, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प.जळगाव,मा.डॉ सचिनजी पानझाडे साहेब गटविकास अधिकारी पं.स.भुसावळ, तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री हरेश्वर भोई व तालुका अभियान व्यवस्थापक श्री विनोद जी पाटील, तसेच प्रभाग समन्वयक प्रिया वाडेकर , प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ वर्षाताई सुरवाडे,सचिव मनिषाताई महाजन , कोषाध्यक्ष सौ पुनम ताई प्रधान,रोहिणी ताई कोलते सरपंच पिंपरीसेकम निंभोरा बु!!, सौ रोहिणी ताई प्रशांत पाटील सरपंच कठोरे बु!!, सौ शामल ताई अतुल झांबरे संचालिका जिल्हा दूध संघ, भाजपा तालुका अध्यक्ष श्री गोलू भाऊ पाटील व श्री प्रशांत भाऊ पाटील तसेच श्री उल्हास भाऊ बोरोले, सनी भाऊ चाहेल, हनीभाऊ चाहेल, दुर्गेश कोलते, संजय भारंबे आणि हजारोच्या संख्येने बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.

Spread the love