जय बलराम शेतकरी गट, तळवे यांच्या वतीने आयोजित चर्चासत्रात कृषी तज्ञ, अधिकारी व शेतकऱ्यांचा सहभाग
तळोदा -: शेतीतील नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब, रब्बी हंगामाचे नियोजन आणि शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जय बलराम शेतकरी गट, तळवे व तालुका कृषी कार्यालय, तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘किसान गप्पा गोष्टी’ या चर्चासत्राचे आयोजन सलसाडी येथील श्री. विजयराव सोनवणे यांच्या शेतावर करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सुरुवातीला आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छांनी करण्यात आले. प्रगतिशील शेतकरी श्री. विजयराव खुशालसा सोनवणे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करत सर्व मान्यवरांचे स्वागत केले व शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून तळोदा तालुका कृषी अधिकारी श्रीमती.मीनाक्षी वळवी, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख,श्री. राजेंद्र दहातोंडे , सोमावल-१ उपकृषी अधिकारी, श्री. विकास अहिराव, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा प्रक्षेत्र व्यवस्थापन श्री. राजेश भावसार, तालुका आत्मा प्रमुख श्री.विपुल चौधरी यांनी मार्गदर्शन केले यावेळी तळवे गावाचे सरपंच श्री.मोग्या दादा भिल, सलसाडी सहाय्यक कृषी अधिकारी श्री.दीपक पावरा, सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा अध्यक्ष ॲड.उमेश भैय्या विजयसा सोनवणे आणि जय बलराम शेतकरी गट,तळवे अध्यक्ष श्री.छोटू नाना कलाल उपस्थित होते. श्रीमती. मीनाक्षी वळवी, तालुका कृषी अधिकारी, तळोदा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आजच्या काळात वैज्ञानिक शेती आणि शासकीय योजनांचा योग्य वापर हेच शेतकऱ्यांच्या प्रगतीचे प्रमुख साधन आहे. कृषी विभागामार्फत अनेक योजना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी माहितीपूर्ण राहणे आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक आहे.”श्री. राजेंद्र दहातोंडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शेती उत्पादनाला मूल्यवर्धन देण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची दिशा घेणे गरजेचे आहे. केळी, मिरची, पपई यांसारख्या पिकांवर आधारित लघुउद्योगांद्वारे शेतकऱ्यांना उद्योजकतेकडे वळवता येईल. शेतकरी हे फक्त उत्पादक न राहता उद्योजक बनले पाहिजेत.”
यावेळी उपस्थित असलेले शेतकरी श्री गोटू नाना कलाल, तळवे प्रताप गिरासे प्रतापपूर चंद्रकांत सोनवणे तळवे दिलीप भदाने प्रतापपूर, सोमनाथ पाटील मोरवड अतुल पाटील मोरवड संजय पाटील तळवे दिलीप साळुंखे तळवे भटू पाटील तळवे नारायण गायकवाड तळवे गोपाळ पाटील तळवे सागर पाटील तळवे डॉ.शांतीलाल पिंपरे तळोदा, प्रा राजाराम राणे तळोदा, शिरीष मगरे तळोदा संजय मराठे तळवे, अनिल नाईक सलसाडी, रामकृष्ण दादा सलसाडी, कांतीलाल पाडवी पांडूरके, दिलीप पाडवी पांडुरके व अन्य शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन ॲड.उमेशभैय्या विजयसा सोनवणे आभार श्री.छोटू नाना कलाल, यांनी आभार प्रदर्शन केले.











