जळगाव – महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तक जमा करण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा ग्रंथालय परिचरने विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली.
याप्रकरणी मंगळवारी (ता. ३१) विद्यार्थिनीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला. कैलास दत्तात्रय कडभाने (वय ५२, रा. समर्थ कॉलनी, रामानंद नगर) असे संशयिताचे नाव आहे.
जळगावमध्ये आजीकडे राहणारी विद्यार्थिनी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत आहे. २६ ऑक्टोंबरला लेखी परीक्षा झाल्यावर ती ग्रंथालयात पुस्तक जमा करण्यासाठी गेली होती.
त्यावेळी ग्रंथालय परिचर कैलासने दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेच्या विषयाचे पुस्तक नेण्याचा आग्रह केला. विद्यार्थिनीने नकार दिल्यावरही त्याचा आग्रह सुरु होता.
विद्यार्थिनी ग्रंथालयातून जाताना तिचा विनयभंग केला. विद्यार्थिनी सुटका करुन घेत घर गाठले आणि आजीला हा प्रकार सांगितला. विद्यार्थिनीने शिक्षिकेला माहिती दिली. विद्यार्थिनी आणि पालकांनी कैलासविरुद्ध तक्रार दिली.