यावल – भाजपाचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जळगाव जिल्हा भाजपा वैद्यकीय आघाडी उपाध्यक्ष डॉ. सुनिल पाटील साकळीकर यांनी शालेय साहित्याचे वाटप पिळोदा ता. यावल येथे केले.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 22जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस असून राज्यभर दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी राज्यातील गंभीर पुरपरिस्थिती त्याचप्रमाणे इर्शालवाडी, खालापूर सारखी घटनेमुळे त्यांनी स्वतः व भाजपा पक्षाने हा दिवस “सेवादिवस ” साजरा करीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष डॉ. सुनिल पाटील साकळीकर यांनी पिळोदा ता. यावल येथील जि.प. प्राथमिक शाळेत शालेय साहित्याचे वाटप भूमी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून केले त्यांअतर्गत त्यांनी त्या दुरेघी, चाररेघी, चौरस वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर अश्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत छोटेखानी समोजपयोगी उपक्रम राबविला.
सदर कार्यक्रमास पिळोदा येथील माजी सरपंच मनोहर पाटील, माजी सरपंच गिरधार पाटील, सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील, श्यामकांत पाटील, भाजयुमो कार्यकर्ते अजय पाटील, आबासाहेब पाटील, विजयबापु पाटील तसेच मुख्याध्यापक संजय पाटील यांसह नागरिक उपस्थित होते.