सुनसगाव उपकेंद्र अंतर्गत जंतनाशक दिनानिमित्त गोळ्या वाटप.

0
17

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र वराडसिम अंतर्गत येणाऱ्या सुनसगाव उपकेंद्राच्या टीम ने अंगणवाडी, जिल्हा परिषद मराठी शाळा व दादासाहेब दामु पांडू पाटील माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी व विद्यार्थींनी यांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात आल्या यावेळी उपकेंद्राचे सीएचओ डाँ रुपेश पाटील, आरोग्य सेविका विजया पाटील, आरोग्यसेवक संजय कोळी ,आशासेविका ज्योती पाटील , सुनिता काटे, मदतनीस शकुंतला पाटील यांनी गावातील १ ते १९ वर्षाच्या मुला मुलींना जंतनाशक गोळ्या दिल्या. अंगणवाडी व शाळांमध्ये सर्वांनी सहकार्य केले. गोंभी येथे आशासेविका प्रतिभा पाटील यांनी अंगणवाडी व मराठी शाळेत गोळ्या वाटप केल्या तर बेलव्हाळ येथे आशासेविका शारदा इंगळे यांनी अंगणवाडी व मराठी शाळेत गोळ्या वाटप केल्या. जंतनाशक दिनाच्या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका चारुशिला बेंडाळे, संगीता धनगर, पल्लवी बाविस्कर ,मदतनिस शोभा चौधरी, आशा चौधरी मोहिनी पाटील तसेच जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका व शिक्षिका आणि दादासाहेब दामू पांडू पाटील प्राथमिक व माध्यमिक चे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Spread the love