जळगाव – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई, दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे,
जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव व जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग मुला मुलींच्या शाळा व कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी कै. ब गो शानबाग विद्यालय सावखेडा बु ता.जि.जळगाव या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग मुला मुलींच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा अति उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.ना.श्री गुलाबरावजी पाटील साहेब, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. प्रविण महाजन साहेब जिल्हाधिकारी जळगांव,मा.श्री.डॉ.पंकज आशिया साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव,मा.श्री.बाळासाहेब मोहन साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव,मा.श्री.विकास पाटील साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगांव,मा.श्री.विजय रायसिंग साहेब जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जळगांव,श्री. भरत चौधरी वैसाका समाज कल्याण दिव्यांग विभाग,आदरणीय मीनाक्षीताई निकम अध्यक्षा दिव्यांग विकास बहु.संस्था चाळीसगांव हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.मान्यवरांच्या स्वागतानंतर जळगांव जिल्हयातील दिव्यांग असून देखील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बंधू भगिनीचा सन्मान पत्र देवून सत्कार करण्यात आला.त्यात मीनाक्षीताई निकम अध्यक्षा दिव्यांग विकास बहु.संस्था चाळीसगांव,श्री.वर्धमान भाऊ धाडीवाल दिव्यांग सेवक चाळीसगाव, इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखा जळगाव संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव, मनीषा पाटील अध्यक्षा नारी शक्ती जळगाव, सोपान गणेश कर व्यवस्थापक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव, मुकुंदा देवपुरी गोसावी अध्यक्ष मुक्ती फाउंडेशन जळगाव, गणेश कौतिक पाटील अध्यक्ष संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्था जळगाव, भरत रामा जाधव दिव्यांग सेना महाराष्ट्र सचिव ,शेख शकील शेख मुतालिक दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष जळगाव, दत्तात्रेय ,(अक्षय) रामचंद्र महाजन अध्यक्ष दिव्यांग सेना सामाजिक संस्था जळगाव ,संगीता हंसराज प्रजापत अध्यक्ष दिव्य अपंग बचत गट जळगाव,किशोर गजानन नेवे अध्यक्ष अपंग बांधव समिती जळगाव, संजय रामदास पाटील अध्यक्ष राष्ट्रीय अपंग विकास महासंघ धरणगाव तालुका, सरला धनराज सोनवणे महिला जिल्हाध्यक्ष दिव्यांग सेना ,सविता हरी साठे शिव अस्तित्व दिव्यांग सामाजिक संस्था जळगाव, बिरजू छगन चौधरी अध्यक्ष राष्ट्रीय विकलांग पार्टी, जितेंद्र नामदेव पाटील सामाजिक कार्यकर्ता ,हरिराम संतोष तायडे जिल्हा सचिव दिव्यांग सेना ,ज्ञानेश्वर दामोदर पाटील सामाजिक कार्यकर्ता दिव्यांग सेना यावल तालूका अध्यक्ष, योगेश गणेश चौधरी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर, रहिसा मोहिद्दिन पिंजारी मेहंदी हस्तकला आर्ट्स, विजय दिलीप हुंडीवाले स्पेशल ओलंपिक जलतरणपटू ,लीलाधर पाटील शेळीपालन वाळकी तालुका चोपडा ,प्रतिभा फकीरा पाटील दिव्यांग महासंघ महिला जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
पेंशनर दिनानिमित्त विशेष शाळा ममता मतिमंद विद्यालय अमळनेर येथील विशेष शिक्षक सुरेश पितांबर महाले सर,उत्कर्ष मतिमंद विद्यालय जळगांव येथील वाहन परिचर श्री.दौलत पवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सेवापूर्ती सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देवून सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तद्नंतर मान्यवरांच्या मनोगतात प्रमुख पाहुणे मा.श्री.डॉ. पंकजजी आशिया साहेब यांनी दिव्यांग मुलांना क्रीडा स्पर्धेनिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यक्रम अध्यक्ष मा.ना.श्री.गुलाबरावजी पाटील साहेब यांनी शासनाने 3 डिसेंबर रोजी दिव्यांग मंत्रालय स्थापन करणे बाबत सांगुन आपले परमार्थ करत असताना दिव्यांग व्यक्तीमध्ये देव पाहून त्यांना वेळोवेळी त्यांची मदत करून समाज सेवा केली पाहिजे.तसेच आमदार निधीतून दिव्यांगासाठी व्हील चेअर , कर्ण यंत्र ,अंध काढी ,तीन चाकी सायकल असे साहित्य वाटप करण्यात येते व आपलं केले आहे.तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेनिमित्त शुभेच्छा दिल्या. तदनंतर दिव्यांग व्यक्ती साठी वेळोवेळी मदत करणारे, सहकार्य करणारे जळगांव समाज कल्याण दिव्यांग विभाग वैद्यकीय सामजिक कार्यकर्ता भरत चौधरी यांचे जळगांव जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या संघटना व संस्था यांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या समवेत मान पत्र देवून गौरविण्यात आले.त्यानंतर दिव्यांग शाळेतील विद्यार्थी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते अश्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मा.श्री.प्रविण महाजन जिल्हाधिकारी जळगांव,मा.श्री.डॉ.पंकज आशिया साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव,मा.श्री.बाळासाहेब मोहन साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव,मा.श्री.विकास पाटील साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगांव,मा.श्री.विजय रायसिंग साहेब जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जळगांव,श्री. भरत चौधरी वैसाका समाज कल्याण दिव्यांग विभाग,आदरणीय मीनाक्षीताई निकम अध्यक्षा दिव्यांग विकास बहु.संस्था चाळीसगांव यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर अस्थिव्यंग, अंध,मुकबधीर,मतिमंद, बहुविकलांग या विशेष मुलांच्या 50 मीटर धावणे 100 मीटर धावणे स्पॉट जंप लांब उडी गोळा फेकणे लगोरी फोडणे बुद्धिबळ 25 मीटर चालणे व्हीलचेअर वरून बॉल फेकणे अशा प्रकारच्या विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रवण विकासच्या विशेष शिक्षिका निलिमा तरवटे दीदी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिव्यांग विभाग वैसाका भरत चौधरी साहेब तर कार्यक्रमाचे आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग साहेब यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग मुला मुलींच्या विशेष, शाळा व कार्यशाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.










