डी. जे. तालावर नाचुन नव्हे तर बाबासाहेब वाचुन समाजासमोर पोहचविण्याची गरज

0
45

जळगाव – डॉ.बाबासाहेबांच्या विचाराची आणी संघर्षाच्या भावनेची गरज जाणवत असतांना बहुजन समाजाची मुले मोठ्या पदावर गेली पाहिजे. केवळ डि.जे. तालावर नाचून नव्हे तर बाबासाहेब वाचुन समाजासमोर पोहचविण्याची गरज आहे. असे आवाहन बापुराव पानपाटील यांनी केले. सोनी नगरातील महागौेतमी महिला संघातर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रा.अनिता वानखेडे, बापूराव पानपाटील, भीमराव सोनवणे, शशिकांत साळवे, विनोद निकम, शाहीर विजय वानखेडे, कवी अरुण गवई, श्रीकृष्ण सुरडकर, विलास इंगळे, शाह मास्टर, संतोष सुरडकर, आदी मान्यवर उपस्थित होते. सोनी नगरातील महागौेतमी महिला संघ व तक्षशिला परिवारतर्फे भिमजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

भिमजन्मोत्सव कार्यक्रमाचि सुरुवात शाहु, फुले, आंबेडकर यांच्या प्रबोधनपर कार्यक्रमात मलकापुरचे शाहिर विजय वानखेडे, कवि अरुण गवई, विलास ईंगळे, श्रीकृष्ण सुरडकर, विलास इंगळे, शाह मास्टर, संतोष सुरडकर या कलावंतानि ज्योतिबा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गितगायनातून जिवन प्रवास व समाज प्रबोधनपर महत्व सांगितले. त्यानंतर महागौेतमी महिला संघाच्या संगिता भालेराव, सिंधू जाधव ,भारती जाधव, ज्योती निकम यांनी डॉ. बाबासाहेब यांचा जन्मदिवस पाळणा हलवून व केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील महिला, युवा व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

सकाळी 10 वाजता गणपती नगरातून रॅली काढण्यात आली यावेळी महिलानि पांढरी साडी व तर पुरूषानि पांढरा कुर्ता व निळा फेटा परिधान करून डॉ. बाबासाहेबांच्या जय घोषाने गणपती नगर व सोनीनगर परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुपारी 12 वाजता सोनि नगरात व्याख्यानाचा कार्यक्रम प्रसंगी भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. बापूराव पानपाटील यांनी सांगितले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी

आपल्या समाजाला ज्ञानाचे महत्व अधोरेखित केले आणि शिक्षणाच्या क्षेत्रात मोलाचे कार्य केले.आज आपल्या सर्वांवर ही जबाबदारी आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांना आपण साकार करावे. असे आवाहन त्यानि भिमसैनिकांना केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापू साळूंखे तर प्रास्तविक नरेश बागडे यांनी व विनोद निकम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महागौेतमी महिला संघ व तक्षशिला परिवारचे सर्व अनुयायी तसेंच प्रकाश जाधव, आकाश सोनवणे, विनोद निकम, विनोद लोखंडे, अविनाश जाधव, मयुर भालेराव, कैलास साळवे, सागर सुरडकर,सागर सोनवणे, समाधान सपकाळे सुकदेव सपकाळे, देविदास पाटील, भारती जाधव, सोनाली सोनवणे, प्रियंका सुरडकर, निशा सुरवाडे,आशा बागडे, राधिका बागडे, संगिता राजपुत, सरदार राजपूत, यशवंत पाटील, हेमराज गोयर, अजय बागडे, संदिप जाधव, दिनेश जाधव, निलेश मिस्तरि आदिनि परिश्रम घेतले.

Spread the love