डोगर कठोरा येथिल दलित वस्तीतील निकृष्ठ कामाची चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा

0
12

(यावल प्रतिनिधी) यावल तालुक्यातील डोगर कठोरा ग्रामपंचायत अर्तगत झालेल्या टक्केवारीच्या स्वार्थासाठी दलित वस्तीतील निकृष्ठ कामाची चौकशी करण्यात येवून कार्यवाही करण्यात यावी तसे न झाल्यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा मागणीचे लिखित निवेदन निळे निशान या सामाजीक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे या संदर्भात अशोक तायडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की डोगर कठोरा ग्रामपंचायत अर्तगत दलित वस्तीमध्ये शासनाने लाखो रूपये खर्च करीत कॉक्रीटी रस्ता व गटारी व आदी कामे करण्यात आली असून ही सर्व कामे शासकीय निवेदनातील ठरवून दिलेल्या निविदा प्रमाणे साहीत्य वापरून दलित वस्तीतील समाज बांधवांची आर्थिक स्वार्थाला बळी पडून ठेकेदार व अधिकारी मंडळी दिशाभूल करणार्‍यां यावल पंचायत समितीमधील अधिकारी यांच्या कार्यपद्धतीची तात्काळ चौकशी करण्यात यावी तसेच टक्केवारीच्या बाळाच्या बळावर गुणवत्तापूर्ण काम न करता अत्यंत निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावेत तसे न झाल्यावर निळे निशान समाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी दिला आहे.

Spread the love