सुनसगाव – येथील गोजोरा रस्त्यावर असलेल्या सुदर्शन पेपर मील अॅन्ड प्राॅडक्टस् कंपनी मध्ये पेपर मील व रोटरी क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन रेडक्रास सोसायटी जळगाव यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास १०१ बाटल्या रक्तदान करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी सुदर्शन पेपर मील चे मालक राजीव चौधरी यांनी स्वता: रक्तदान केले हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे. यावेळी कंपनीच्या कामगारांनी रक्तदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्साह दाखवला विशेष म्हणजे गोंभी व गोजोरा येथील नागरिकांनी सहकार्य केले. कंपनीच्या माध्यमातून व्ही आर पाटील, गोकूळ गाजरे, निलेश भोळे, कल्पेश अहिरकर, किरण बोरोले, दिपक जावरे , ऋषिकेश पाटील, दिपक जाधव यांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कंपनीच्या उपक्रमातून १०१ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. याचा फायदा गरजू रुग्णांना होईल असे इंडियन रेडक्राॅस सोसायटी चे अधिकारी व कर्मचारी यांनी सांगितले.