जळगाव – मी साधा माणूस नाही. मी संजय राऊतांसारख्याला घाम फोडतो. त्यामुळं माझ्या नादी लागू नका, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील दोनगाव इथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी पाटील बोलत होते. मी बारक्यांच्या नादी लागत नाही असंही ते म्हणाले.
विधानसभेत नुसता उभा राहिलो तर समोरच्याला प्रश्न पडतो
गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर कडाडून टीका केली. उध्दव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेला पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं. माझ्या नादी काय लागता. मी बारक्यांच्या नादी लागत नाही. संजय राऊतांसारख्या माणसाला मी घाम फोडतो असे पाटील म्हणाले. विधानसभेत नुसता उभा राहिलो तर समोरच्याला प्रश्न पडतो भाऊ काय बोलणार आहे, असेही पाटील म्हणाले.