प्रतिनिधी – राजेंद्र महाले
रावेर – फैजपूर येथील डाॅ. सौरभ ज्ञानेश्वर ढोले याने एम.जी.एम.मेडिकल काॅलेज अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूड ,औरंगाबाद येथून एम.बी.बी.एस.ची पदवी प्राप्त केली.तो नूतन माध्यमिक विदयालय चिनावल शाळेतील उपशिक्षिका श्रीमती.मनिषा ज्ञानेश्वर ढोले यांचा मुलगा आहे. तो प्रथम वर्षाची परीक्षा देत असतांनाच मस्कावद वा.कृ.पाटील विदयालयात नोकरी करीत असलेल्या कै.ज्ञानेश्वर गंगाराम ढोले वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाल्याने वडिलांचे कृपाछत्र हरविले होते. त्या दु:खातून बाहेर पडत मोठया हिमतीने मेहनत करुन त्याने ही पदवी प्राप्त केली व आईवडलांचे स्वप्न पूर्ण केले. सर्व नातेवाईक मित्रपरिवार व परिसरात त्याचे अभिनंदन होत आहे.आईने ही स्वत:ला डोंगरा एवढ्या दु:खातून सावरुन मोठ्या जिद्दीने त्याला शिक्षणासाठी बळ दिले. त्याला त्याचे मामा ए.सी.पी.एम मेडिकल काॅलेज धुळे येथील प्रा.डाॅ.राहुल वाडीले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तसेच काका श्री.जगदीश ढोले ,दत्त डेअरीचे संचालक श्री.राजेद्र भोई यांचेही सहकार्य लाभले.












