सुनसगाव शिवारातील शेती रस्ते चिखलात? वाहने जात नसल्याने शेतकऱ्यांना करावी लागते पायपीट 

0
39

सुनसगाव – येथील शेती शिवारात जाण्यासाठी शेती रस्ते आहेत मात्र आता सध्या शेती रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली असून शेतकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या बाबत माहिती अशी की, येथील शेती शिवारात काही वर्षांपूर्वी रस्ते तयार करण्यात आले होते मात्र त्यावेळी रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची झाली होती मात्र, या कामांना कोणीही विरोध करायला तयार नव्हते कारण ज्याने त्याने’ आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी भूमिका घेतलेली होती . त्यामुळे संबंधित ठेकेदाराने आपल्या पद्धतीने रस्ते तयार करून मोकळा झाला असून आता याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. जवाहर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हे रस्ते तयार करण्यात येत होते मात्र ही योजना फक्त नावालाच होती कारण सर्व कामे जेसीबी मशीन ने उरकविण्यात आले होते गावातील दोघा तिघांनी याला विरोध केला होता तेव्हा जेसीबी मशीन चे फोटो ही काढले होते मात्र हे लोक गावात कामे होऊ देत नाही अशी तक्रार काही अतीसुज्ञ नागरीकांनी केली होती त्यामुळे आज या शेती शिवारातील रस्त्यांची दयनीय अवस्था असून शेतकरी कसे तरी बैलगाडी शेतापर्यंत नेतांना दिसत आहेत. आपले वाहने मोटरसायकल, रिक्षा व ट्रॅक्टर सारखी वाहने रस्त्यावरच लावावी लागत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी सुज्ञ शेतकऱ्यांनी केली आहे.

Spread the love