भुसावळ – तालुक्यातील वेल्हाळे शिवारात दि.४ मार्च च्या रात्री अचानक विजांच्या कडकडाटासह वादळामुळे पावसाने थैमान घातले त्यामुळे मोठ्या प्रमाणात केळी , मका ,गहू ,भरभरा व भाजीपाला पिके उध्दवस्त झाली आहेत.
घटनेची माहिती मिळताच मिळताच दुसऱ्या दिवशी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे, भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील ,माजी सभापती सुनील महाजन व पदाधिकाऱ्यांनी नुकसान ग्रस्त शेतीशिवाराची पाहणी केली . यावेळी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना या परिसरात भेट देऊन तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या . यावेळी गावातील पदाधिकारी व शेतकरी हजर होते.