यावलं – तालुक्यातील दुसखेडा येथील सरपंच लक्ष्मीबाई यशवंत सोनवणे यांचे विरोधात उपसरपंचासह सदस्यांनी कारवाई व्हावी अशी तक्रार केली होती परंतु सदर तक्रारी संदर्भात चौकशी साठी अधिकारी आले असता माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्या बाबतचे पत्र सरपंच यांनी चौकशी अधिकाऱ्यांना दिले यावेळी पत्रात म्हटले आहे की मी सरपंच लक्ष्मीबाई यशवंत सोनवणे (आदिवासी महिला) आहे. मला उपसरपंच जगन्नाथ धुडकु पाटील यांनी आपण सहा महिने रजेवर जावे व मला ग्रामपंचायत दुसखेडा चा कारभार पाहु दया असे म्हटले असता मी त्यांना नकार दिला म्हणुन माझ्यावर खोटे आरोप करून माझ्या नावाची बदनामी करीत आहेत. तरी त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी,
रेल्वे स्टेशन दुसखेडा, यांचेशी पाणीपुरवठ्यासंदर्भात मागे झालेला करार हा सरपंच ग्रा.पं. दुसखेडा यांच्या नावे होता. तरी सरपंच पदावर महिला असताना उपसरपंच जगन्नाथ धुडकु पाटील यांनी बेकायदेशीररित्या सहयांचा बिल बनवण्याचा अधिकार स्वतः घेतले होते, तशी मी पुरावा म्हणून बिलाची प्रत सोबत दिली आहे. तरी त्यांची चौकशी व्हावी.
ग्रामपंचायतीचा रेल्वे स्टेशन दुसखेडा यांचेशी पाणीपुरवठा करार संपलेला होता. पुढील करार करण्यासाठी उपरपंच यांनी माझ्या कोऱ्या लेटरपॅडवर सहया घेवून पत्रव्यवहार केले. त्यात त्यांनी जास्त रकमेची मागणी केली असता डीआरएम ऑफिस, भुसावळ यांचे पत्र (पोस्टाद्वारे मला मिळाले. पत्र सरपंच या नावाने आले असता मी स्वतः जावून चौकशी केली असता त्या पत्रात उपसरपंच यांनी पाचशे रुपये प्रती हजार लिटर प्रमाणे करार करावा असे पत्र उपसरपंच यांनी डीआरएम ऑफिस, भुसावळ यांना जावुन दिले होते. त्यांचा पुरावा म्हणुन मी त्यांच्या स्वःअक्षरात लिहिलेले पत्राची छायांकित प्रत सोबत जोडत आहे. ते त्यांनी टायपिंग करून सरपंचाच्या कोऱ्या लेटरपॅडवर सह्या घेवून नंतर टाईप केले आहे. पत्रावर त्यांनी आपल्या मनाप्रमाणे रकमा टाकल्या आहेत.
सरपंच या नात्याने ग्रामपंचायतीला रेल्वे स्टेशन दुसखेडा येथिल पाण्याचा करार 1) मिळावा म्हणून मी स्वतः नंतर 25000/- प्रतिमहा किंवा 18000/- प्रतिमहा असे दोन पत्रव्यवहार डीआरएम ऑफिस, भुसावळ यांचेकडे केले. त्याबाबत नंतर प्रत्युत्तर मिळाले नाही.
डीआरएम ऑफिस, भुसावळ यांचा पाणी करारासंबंधीत टैंडर हे ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने निघत असल्याने कोणीही त्यात सहभाग घेवू शकतो. त्यात माझा (सरपंच लक्ष्मीबाई यशवंत सोनवणे) काहीही संबंध नाही. सदरील टैंडरचे आदेश हे डीआरएम ऑफिस, भुसावळ करीत असल्याने त्यात ग्रामपंचायत किंवा सरपंच यांचा काहीही संबंध नाही.
मी सरपंच लक्ष्मीबाई यशवंत सोनवणे (आदिवासी महिला) आहे. उपसरपंच जगन्नाथ धुडकु पाटील हे ग्रामपंचायतीत त्यांचा हुकुमशाही कारभार चालवण्याचे व मीपणा करण्याचे तसेच बेकायदेशीर व्यवहार करण्याचा प्रयत्न करुन मला गावामध्ये बदनाम करीत आहेत. मला ग्रामपंचायतीचे विकास कामे करण्यास जाणुनबुजुन अडथळे आणण्याचे काम करीत आहे. तसेच मला अरेरावीची भाषा करुन माझ्यावर नेहमी दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असतात.
तरी चौकशी अधिकारी, पंचायत समिती, यावल यांनी उपसरपंच यांच्या हुकुमशाही वागणुकीची व रेल्वे स्टेशन, दुसखेडा यांचेशी पूर्वी केलेल्या कराराचे बिल काढण्यासाठी सरपंच यांना डावलून स्वतःचे सहयांचे अधिकार वापरुन गैरप्रकारे बिल काढल्याची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी ही विनंती.अशी मागणी सरपंच लक्ष्मीबाई यांनी केली आहे.












