भूखंड खा, कुणीश्रीखंड खा! गद्दार बोलो, सत्तार बोलो!! अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यासाठी विधिमंडळात रणकंदन

0
12

शिंदे-फडणवीस सरकारचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा व मंत्रिमंडळातील त्यांच्या हकालपट्टीच्या मागणीवरून आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड रणपंदन झाले. सत्तारांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांपासून सभागृह दणाणून टाकले. ‘सत्तारांनी घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके..एकदम ओके …’, ‘श्रीखंड खा, कुणी भूखंड खा’ अशा घोषणा देत विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळय़ा जागेत ठिय्या मारला. या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला, पण विरोधक प्रचंड आक्रमक झाल्यामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावे लागले.

शासन आदेश व जिल्हा न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवत अब्दुल सत्तार यांनी कृषी राज्यमंत्री असताना वाशीम जिह्यातील 37 एकर गायरान जमिनीचे खासगी व्यक्तीला वाटप करण्याचे प्रकरण धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाचे पडसाद विधानसभा व विधान परिषदेतही उमटले. विधानसभेत हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. अध्यक्षांनी चर्चेची परवानगी नाकारताच विरोधकांनी ‘राजीनामा द्या… राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या’, ‘अब्दुल सत्तार यांची हक्कालपट्टी झालीच पाहिजे…गायरान जमीन बेचनेवालो को जुते मारो’, ‘वसुली सरकार हाय हाय…’ अशा घोषणा सुरू केल्या. तरीही अध्यक्षांनी कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा विरोधकांनी मोकळय़ा जागेत ठिय्याच मारला आणि घोषणा सुरूच ठेवल्या. ‘गोविंद बोलो हरी गोपाल बोलो’ या भजनाच्या धर्तीवर टाळय़ांचा ठेका धरत ‘सत्तार बोलो.. सत्तार बोलो…’ घोषणा सुरू केल्या. त्यात भर घालत ‘श्रीखंड घ्या कुणी भूखंड घ्या…’ अशा घोषणा सुरू झाल्या. अध्यक्षांनी तीनदा सभागृहाचे कामकाज स्थगित केले. पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्यानंतर अब्दुल सत्तार दिवसभर नॉट रिचेबल झाले होते. सायंकाळी उशिरा ते पत्रकारांसमोर आले आणि गायरान जमिनीबाबत उद्या, मंगळवारी विधानसभेत माझे म्हणणे मांडेन असे त्यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियमावर बोट ठेवत अधिक चर्चा करण्याची परवानगी नाकारली तेव्हा विरोधक संतप्त झाले आणि अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळय़ा जागेत जमले आणि घोषणा देत अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले.

अजित पवारांनी फोडून काढले

मंत्रिमंडळातून अब्दुल सत्तार यांच्या हकालपट्टीच्या मुद्दय़ावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सत्ताधारी पक्षाला अक्षरशः पह्डून काढले. अब्दुल सत्तारांनी अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ केली. महिला खासदाराबद्दल गरळ ओकले. जिल्हाधिकाऱ्यांना दारू पितो काय असे विचारले. हा निर्लज्जपणाचा कळस आहे, अशा शब्दांत अब्दुल सत्तारांना फटकारले आणि तुमच्या 115 आमदारांमुळे हे मंत्री झाले. तुम्हीही तेवढेच जबाबदार आहात अशा शब्दात अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सुनावले.

 

 

Spread the love