आयशर ट्रकची दुचाकीला धडक, यावल तालुक्यातील तरुण जागीच ठार

0
13

यावल – भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण परशुराम कोळी हा जागीच ठार झाला.सदरील घटना यावल तालुक्यातील किनगाव रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ घडली.

परशुराम प्रभाकर कोळी,वय ३७, रा. नायगाव ता. यावल हा तरुण गुरुवारी दुचाकी क्रमांक -एम. एच.१९ यु. ८६४ वरून नायगाव येथून किनगावकडे जात असता आयशर क्रमांक एम.एच.१७ बी.डी.८० ने दुचाकीला जबर धडक दिली. अपघातामध्ये परशुराम कोळी हा जागीच ठार झाला तर अपघातानंतर चालक इमरान खान रसूल खान, रा. साकळी, ता.यावल. याने वाहन घेऊन नायगावच्या दिशेने पळ काढला. परंतु, ग्रामस्थांच्या जमावाने वाहन थांबवत वाहनाची तोडफोड करीत वाहन चालकाला चोप दिला. यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहन चालकला वाहनासह ताब्यात घेतले. मयत परशुराम प्रभाकर कोळी यांच्या मृतदेहाचे यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलिसात चंद्रभान सुधाकर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास सहायक फौजदार असलम खान करीत आहे.

Spread the love