तळोदा – :दि. 05/09/2024 वार गुरुवार रोजी 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे अवचित्य साधून सेवाभावे प्रतिष्ठान,तळोदा व एकल विद्यालय अभियान संभाग महाराष्ट्र, अंचल-शहादा संच सोमावल बोरद तर्फे आचार्य सन्मान सोहळा गोपाळपूर पुनर्वसन येथे संपन्न झाला
प्रथम भारत माता व सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवक्ता म्हणून सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा अध्यक्ष चि. उमेश भैय्या विजयसा सोनवणे हे होते व मंचवर उपस्थित एकल संच प्रमुख दिलवर पावरा, संच प्रमुख विपिसिंग पावरा, संच व्यास जामसिंग पावरा,संच समिती सदस्य सुरेश मोर, महिला प्रमुख सौ.गुलशन पावरा हे मंचावर उपस्थित होतो.
यावेळी सोमावल व बोरद संचातील आचार्य सुरेश वळवी,अशोक पावरा,अझडसिंग ठाकरे,एकनाथ पवार, संगिता पावरा,रेखा पावरा,लोशा पावरा,सुनिता मोरे,विक्रम पावरा,रमेश पावरा,संगिता तडवी,भाईदास पावरा,तोरमा वळवी,सायसिंग वळवी,रामदास पावरा,गायत्री वळवी,दिपक वळवी,गौतम पवार हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख प्रवक्ते सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश विजयसा सोनवणे हे म्हणालेत की, नंदुरबार जिल्ह्यात 390 एकल विद्यालय हे सुरू आहे. हे विद्यालय आचार्य हे सांभाळतात. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात विद्यालय सुरू आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान देणे संस्कार देणे हे काम विद्यालयाचे करण्यात येते.
या सन्मान सोहळ्याचे नियोजन संच प्रमुख दिलवर पावरा संच प्रमुख विपिसिंग पावरा,अशोक पावरा यांनी केले