वेतन अधीक्षक विभागात दलालांचा विळखा उपसंचालकांची अचानक जळगावला भेट
जळगाव -: वेतन अधीक्षक विभागाची भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे लक्तरे वेशीला टांगली जात असतांना येथील यंत्रणा काही सुध रायला तयार दिसत नाही.
बोगस शिक्षक भरती करून त्यान्ची बोगस फरकबील काढून देण्यासाठी फाईलीमागे टक्केवारी मिळत असल्यामुळे येथे खूप चांगभलं सुरु आहे.
नामांकित संस्था चालक यांचे जवळचे नातलग दलालांची भूमिका बजावत आपल्या पन्टरांची बोगस बॅक डेट शिक्षक भरतीची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी बादशाह सारखी या कार्यालयात रात्री बेरात्री कुलूप उघडून संगणक चालवतात. त्यात काय काळं गोरं केलं जात हे सांगायला नको.
या विभागातील वरिष्ठ अधिकारी या पंटर लोकांसोबत घरची मंडळी असल्यासारखं वागतात. त्याना येथील महत्वाची कागदपत्रे हाताळत असतांना कोणीच बोलणारे नाही.
कारण त्त्यांचे सम्बन्ध आताचे नाहीत. म्हणून जळगाव जिल्हा शिक्षण विभागात आता बदल्यांचे सत्र शिक्षणमंत्री साहेबांनी राबविण्याची गरज येवून ठेपली आहे.
या कार्यालयातील सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी जळगाव जिल्हा परिषदेचे सिइओ यांनी करून येथील कर्मचारी खाते निहाय चौकशी लावून त्यान्च्या जिल्ह्याबाहेर बदल्या कराव्यात.
येथील सर्व आवक जावक तपासावेत. या कार्यालयात दर आठवड्याला फरकबील काढण्यासाठी एकूण किती प्रस्ताव येतात. त्यान्ची फरकबील मंजूर करून देण्यासाठी कोणकोणते वरिष्ठ अधिकारी आदेश देतात त्याचे सर्व इमेल तपासणी करावेत. वेतन विभागाच्या तिजोरीतून मागील पाच वर्षात एकूण किती फरकबील अदा करण्यात आले आहेत याचा हिशोब आता घेण्याची वेळ आली आहे. व स्वप्नील नावाच्या शासनाच्या एवढा रुबाबदार जावई कोण जावई कोण की अधिकारीही त्याला खुर्ची सोडून देतात याकडे उपसंचालक नाशिक आयुक्त साहेब पुणे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी या स्वप्नील नावाच्या कर्मचाऱ्याकडे जातीने लक्ष देतील का या कर्मचाऱ्यांच्या हातात संपूर्ण माध्यमिक शिक्षण विभाग आहे की काय याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे