महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी योगेश गांधेले यांची निवड

0
41

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील योगेश गांधेले यांची महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ते कुऱ्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयातील तंत्रस्नेही तथा उपक्रमशील शिक्षक आहेत. योगेश गांधेले हे महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची सक्रीय धुरा सांभाळत आहेत. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य, संघटन कौशल्य, नेतृत्व गुण लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.

रविवार दि.११ रोजी जळगाव येथील प न लुंकड कन्या विद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे, प्रदेशाध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ, जिल्हाअध्यक्ष रणजित सोनवणे, मनिषा देशमुख, कार्याध्यक्ष प्रमोद आठवले, विविध संघटनेचे पदाधिकारी, जळगाव डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, जळगाव डायटचे अधिव्याख्याता डॉ. जगन्नाथ दरंदले, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, मुंबई एसएनडीटी महिला विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव प्रा. शांताराम बडगगुजर, एच. डी भिरुड, संभाजी पाटील, जे पी सपकाळे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.या निवडी बद्दल शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Spread the love