उत्साह मूर्ती सोनवणे यांचा सत्कार संपन्न…  

0
42

हेमकांत गायकवाड

चोपडा- पत्रकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष, राष्ट्रीय आदर्श पुरस्कार प्राप्त महात्मा गाँधी शिक्षण मंडळात शिक्षक म्हणून सेवेत कार्यरत संजय सोनवणे सर यांचा, 26 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून ,त्यांचा श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे सत्कार करण्यात आला .संजय सोनवणे सर यांनी कोरोना काळात योद्ध्यासारखे काम केले. कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. सोनवणे सर उत्साह मूर्ती असून कामात अत्यंत तत्पर आहेत .यावेळी यांच्या शुभहस्ते हरिपाठाची आरती करण्यात आली. ह-भ-प श्री गोपीचंद महाराज यांनी प्रास्ताविक केले. नारायण पंडित चौधरी यांनी आभार मानले .यावेळी ह.भ.प. प्रकाश श्रावण चौधरी, जितेंद्र प्रकाश चौधरी ,मुकुंदराव चौधरी, ह भ प ज्ञानेश्वर नेरकर ,शशिकांत चौधरी, देवकांत के. चौधरी, सौ.कल्पनाताई चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा या संस्थांमार्फत केले होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Spread the love