सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर स्वर्गीय कै.भारत खुशालसा सोनवणे यांच्या स्मरणार्थ प्रतिष्ठानतर्फे पाणपोईचे उद्घाटन

0
15

तळोदा – (प्रतिनीधी )उन्हाची तीव्रता जाणू लागल्या असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तहान भागावी यासाठी सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर स्वर्गीय कै.भारत खुशालसा सोनवणे यांच्या स्मरणार्थ प्रतिष्ठानतर्फे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटनाला विठाई जनरल क्लिनिक डॉ.श्री.प्रशांतजी द पाटील,गजानन कृषी ऍग्रो चे संचालक श्री.सुभाषजी चौधरी,कृषिधन ऍग्रो चे संचालक श्री.निलेश शांताराम पाटील,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री श्री.विजयरावजी सोनवणे,कृपासिंधू सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री.देवेंद्र भाऊ कलाल, सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वि.हि.प जिल्हा सेवा प्रमुख डॉ.शांतीलाल जी पिंपरे,प्रखंड अध्यक्ष प्रा.राजारामजी राणे,प्रखंड मंत्री श्री.ऋषिकेश जी बारगड, प्रखंड सेवा प्रमुख श्री.भारत कलाल,प्रखंड उपाध्यक्ष श्री.राजन दादा पाडवी, प्रखंड सहमंत्री श्री.ललित जी पाटील, शहर मंत्री श्री.पवन दादा शेलकर,श्री.सुनील भाऊ वाघ, चि.अथर्व दिलीप कलाल,पाणीपोईचे सांभाळ करणारे श्री.संजय जी कलाल यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला

यावेळी श्री.भरतजी कलाल सर हे म्हणालेत की, प्रतिष्ठानाच्या समाजाच्या उपयोगी अशी योग्य असे कार्य करत असते. सध्या तळोदा शहराच्या तापमान खूप जास्त आहे व ज्या भागात प्रतिष्ठानने पाणपोई सुरू केली त्या भागातील लोकांचे वर्दळ नेहमीच जास्त असते. यामुळे नक्कीच याचा समाजाला उपयोग होईल असे ते म्हणालेत.

या कार्यक्रमाचे नियोजन सेवाभावे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री.सागर अरविंद पाटील,सचिव श्रीमती.कविता कलाल,कार्याध्यक्ष श्री.संतोष चौधरी,संचालक श्री.अतुल पाटील,श्री.नकुल ठाकरे,श्री.अनिल नाईक, चि.पवन सोनवणे यांनी परिश्रम घेतले

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी केले.

Spread the love