कौटुंबिक वादामुळे पतीने रागाच्या भरात पत्नीचा विळ्याने केला खुन…!

0
16

हेमकांत गायकवाड

चोपडा – येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर विळ्याने वार करून खून केल्याची घटना घडली. संजय पुंजू चव्हाण (वय ४८) असे संशयित पतीचे नाव असून पत्नी मीराबाई चव्हाण मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान, याबाबत शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबात असे की, शहरातल्या फुले नगरातील रहिवासी संजय चव्हाण याचे रविवारी सायंकाळी पत्नी मीराबाई चव्हाण हिच्यासोबत वादातून भांडण झाले. याप्रसंगी त्याने संतापात आपल्या पत्नीवर विळ्याने वार केले. यामुळे तिच्या मांडीला जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाले.

जखमी अवस्थेत मीराबाई चव्हाण यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मीराबाईंचा मृत्यू झाला. संबंधीत प्रकरणी या दाम्पत्याचा मुलगा सागर चव्हाण याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भयंकर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Spread the love