प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे, वराडसिम, जोगलखोरी, बेलव्हाळ, गोंभी,गोजोरा, जळगाव खुर्द, वांजोळा, मिरगव्हाण,चोरवड, खेडी व इतर गावांमध्ये अवेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सुनसगाव विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक जितेंद्र काटे यांनी केली आहे.ज्या वेळी पिकांची पेरणी करण्यात आली त्यावेळी पावसाने दांडी मारली परिणामी पिके निघाली नाही.शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. जेव्हा पिके निघाली तेव्हा पिके तयार झाल्यावर पावसाने सततधार लावली त्यामुळे पिके पिवळी पडू लागली. येणारा हंगाम कसाबसा २५ टक्के हाती आला. आता शेतात दलदल असून दुसरा हंगाम रब्बी हाती येईल याची शास्वती नाही.गुरांना चारा उपलब्ध नाही त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वी शासकिय मदत मिळावी अन्यथा परिसरातील शेतकरी एकत्र करून आंदोलन करण्यात येईल त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जितेंद्र काटे यांनी केली आहे.