राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना चोपडा काँग्रेसतर्फे अभिवादन…

0
50

चोपडा : 2 ऑक्टोबर 2021 रोजी चोपडा शहर आणि तालुका काँग्रेसतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. लालबहादुर शास्त्रीजी यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा गांधी आणि शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अँडव्होकेट.संदीप सुरेश पाटील व शहर काँग्रेस अध्यक्ष के.डी. चौधरी यांनी प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली. सर्व उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसा याची आजही गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसजनांनी व्यक्त केले.जनशिक्षण संस्थेचे व्यवस्थापक रवींद्र कुडाळकर यांनी महात्माजींच्या व शास्त्रीजींच्या कार्याचा गौरव केला .प्रदीप निंबा पाटील ,राजेंद्र भास्करराव पाटील, माजी मुख्याध्यापक बापू महाजन, रमाकांत सोनवणे,नंदकुमार सांगोरे, एडवोकेट एस डी पाटील , देवआनंद शिंदे ,श्रीदेवकांत चौधरी, कांतीलाल सनेर ,किरण सोनवणे, ज़िशान सय्यद ,शशिकांत सोनवणे आदी अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी महात्मा , की जय, जय जवान जय किसान, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. कांबळे जणांनी गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास हार अर्पण केला व अभिवादन करण्यात आले.

Spread the love