प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील शिंदी महावितरण कार्यालयातील कर्मचारी सौ. ज्योती शिंपी दि.२५ मार्च रोजी खंडाळा गावामध्ये एकट्या वीज बिल वसुली करत असताना गावातील काशिनाथ बाबुसेठ यांना वीज बिलाबद्दल विचारणा केल्यामुळे सदर ग्राहकाने सर्वांच्या समोर शिवीगाळ केली , सदर माहिती त्यांनी त्यांच्या सहकारी कर्मचारी यांना दिली , सदर घटनेची माहिती तात्काळ विभागातील सर्व कर्मचारी यांच्या पर्यंत गेल्यावर सदर घटनेबद्दल प्रचंड असंतोष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आला. सध्या मार्च महिना असल्यामुळे सर्व महिला व पुरुष कर्मचारी वसुलीसाठी ग्राहकांकडे जाऊन बिल भरण्यासाठी विनंती करत आहे परंतु समाजातील काही घटकांमुळे कर्मचारी यांना काम करताना अशा घटनेचा सामना करावा लागत आहे . सौ .ज्योती शिंपी यांनी भुसावळ तालुका पोलिस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कॉन्स्टेबल विसपुते व तडवी करत आहे . सदर तक्रार दाखल करताना भुसावळ ग्रामीण उपविभागाचे अभियंता श्री. महाजन साहेब , शिंदी शाखेचे अभियंता श्री. आखरे व सर्व सहकारी कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते , आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी सर्व संघटना पदाधिकारी यांनी पोलिस निरीक्षक महेश गायकवाड साहेब यांची भेट घेऊन केली आहे.








