आता छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमांना मिळणार अनुदान मराठी सिनेसृष्टीसाठी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय

0
10

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी सिनेसृष्टीसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेत असतात.

मराठी सिनेसृष्टिल चालना देण्यासाठी आणि चांगले सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सर्वांनी शिंदे – फडणवीस सरकारचं कौतुक केलंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, मराठी सिनेमांना तीन महिन्यात शासकीय अनुदान मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक सिनेमा मराठी इंडस्ट्रीत निर्माण होत आहेत. या सिनेमांसाठी याशिवाय अन्य विषयांवरील प्रेरणादायी सिनेमांसाठी सरकार १ कोटीचे अनुदान देणार आहे.

याशिवाय अनेक मराठी सिनेमे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचं नाव कोरतात. या सिनेमांना दुप्पट शासकीय अनुदान देण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने ‘फिल्म बाजार’ ही ऑनलाईन वेबसाईट तयार करण्याची घोषणा केली आहे.या वेबसाईटच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये स्वप्नील जोशी, महेश कोठारे, संजय जाधव असे अनेक मराठी कलाकार सहभागी असतील.

Spread the love