साकळी – येथील आगामी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीकरता वार्डनिहाय अंतिम आरक्षण दि.६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात नागरिकांची सभा घेऊन जाहीर करण्यात आले. यात दि.२४ नोव्हें.२०२२ च्या राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने सदर राखीव जागांसह इतर जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.निवडणूक निर्णय अधिकारी ए.के.चौधरी यांनी अंतिम आरक्षण जाहीर केले. गावातील एकूण सहा वर्गातून १७ सदस्य निवडून द्यायचे आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे या आरक्षणात पन्नास टक्क्यानुसार महिलांना नऊ जागा देण्यात आल्या आहे. वार्डनिहाय अंतिम आरक्षण पुढीलप्रमाणे
वार्ड क्रं.१ – अनुसूचित जमाती-१,सर्वसाधारण-१,नामप्र (महिला)-१ (एकूण जागा-३)
वार्ड क्रं.२ – सर्वसाधारण-१,नामप्र (महिला)-१, सर्वसाधारण (महिला)-१ (एकूण जागा-३
वार्ड क्रं.३ – सर्वसाधारण-१,अनुसूचित जाती (महिला)-१ (एकूण जागा-२)
वार्ड क्रं.४ – नामप्र-१,अनुसूचित जमाती (महिला)-१,सर्वसाधारण (महिला)-१(एकूण जागा-३)
वार्ड क्रं.५ – नामप्र-१,सर्वसाधारण-१ अनुसूचित जमाती (महिला)-१,(एकूण जागा-३)
वार्ड क्रं.६ – सर्वसाधारण-१ सर्वसाधारण(महिला)-२,(एकूण जागा-३)
त्याचप्रमाणे संपूर्ण गावाची एकूण मतदार संख्या ९७५० आहे.सर्वाधिक मतदार संख्या क्रं.पाच मध्ये १७४० एवढी असून कमी मतदार संख्या वार्ड क्रं.तीन मध्ये ११६५ एवढी आहे.आरक्षण जाहीर करण्याच्या सभेला साकळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विलास साळुंखे,तलाठी व्ही.एच.वानखेडे हे अधिकारी उपस्थित होते.
मार्चे बांधणी सुरू – वार्डनिहाय अंतिम आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता गावास ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागलेले आहे.या निवडणुकीसाठी गावातील सर्वच राजकीय मंडळींकडून जोरदारपणे मोर्चे बांधणी सुरू आहे.त्याचप्रमाणे सर्व इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करणे सुरू केलेले आहे.कोणत्या उमेदवार योग्य राहील ? यासाठी सर्वच राजकीय उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.मुख्य करून या निवडणूकीत लोकनियुक्त सरपंच निवडला जाणार असल्याने सरपंच पदाच्या निवडीसाठी सर्वच इच्छुकांची मोठी कसोटी लागणार आहे.एकूणच ग्रामपंचायत निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे गावातील सध्याच्या राजकीय हालचालींवरून दिसून येत आहे.
अंतिम आरक्षणावर आक्षेप – साकळी ग्रामपंचायत निवडणुकीकरिता काढण्यात आलेल्या अंतिम
वार्डनिहाय आरक्षणावर माजी ग्रा.पं.सदस्य दिपक पाटील यांनी सभेदरम्यान आक्षेप घेतला.दि.२० जूनला जे वार्डनिहायआरक्षण काढलेले होते त्या आरक्षणाचा काहीही विचार न करता फेरआरक्षण कसे काढले.लोकांना अंधारात ठेवून नवीन वार्डआरक्षण केलेले असून अधिकारी वर्ग आपल्या समरीपावर चा वापर करून निवडणूक कार्यक्रमादरम्यान ग्रामंस्थाची दिशाभूल करीत आहे. असा थेट आरोप दिपक पाटील यांनी अधिकाऱ्यांवर केला.