कासोदा – १५ वा वित्त आयोगाच्या ठरावा अन्वये दिव्यांग योगेश चौधरी यांना कासोदा ग्रामपंचायतीकडून एक व्यावसायिक गाळा भाडे तत्वाने बांधून देण्यात येईल असा ठराव ग्रामपंचायतीने दिनांक २१/७/२०२० रोजी चौधरींना देण्यात आला होता. परंतु वारंवार पञ व्यवहार करून देखील कासोदा ग्रामपंचायतने दिव्यांग कायद्दाची योगेश चौधरींना केराची टोपली दाखवण्याचा प्रकार करण्यात आला. आपणास कासोदा ग्रामपंचायत कार्यालयाकडून न्याय मिळणार नाही हे समजताच अखेर योगेश चौधरींनी एरंडोल पंचायत समितीचे मा. गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलने व आमरण उपोषणही केले यात फक्त कागदोपञी लेखी आश्वासनावर आश्वासने ही सतत ३ वर्षापर्यंत मिळत गेली. येथेही आपल्याला न्याय मिळणे अवघड असताना पण आपली जिद्द व चिकाटीच्या जोरावर पुढे हार न मानता त्यांनी जळगाव जिल्हा परिषद समोर आमरण उपोषणाचा पविञा घेताच त्यांच्या या धाडसी निर्णय बघताच ज्या दिवशी आमरण उपोषणाला बसणार त्याच्या अगोदर कासोदा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकार्यांकडे एक लेखी पञ काढून याबाबत सुनावणी घेण्यात आली तीही पण अर्धवटच! आता येथेही न्याय मिळणार नाही या आशेने नाउमेद न होता पण आपली जिद्द व चिकाटी सोडली नाही. एवढे प्रयत्न व पाठपुरावा करून देखील हाती काही यश मिळत नाही यातून खचून न जाता परत एकदा प्रयत्न करून शेवटी कासोदा ग्रामपंचायतीलाच आत्मदहनाचा इशारा दिला. याच इशार्यानेच सर्वच प्रशासन खळबळून जागे झाले व आज दिनांक ६/१०/२०२३ रोजी कासोदा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मा. चव्हाण भाऊसाहेब यांनी एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. अहिरे साहेब, कासोदा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी जितेश पाटील, इमरान पोलीस, एरंडोल नगर परिषदेचे मा. माजी नगरसेवक पापाजी दाभाडे, कासोदा ग्रापचे माजी सरपंच महेशजी पांडे, सदस्य भैय्या राक्षे, नरेश ठाकरे व इतर सदस्य व ग्रापचे कर्मचारी वृंद तसेच प्रहार संघटनेचे पारोळा महिला अध्यक्षा ललिताताई पाटील, दिव्यांग शक्तीचे प्रतिनिधी प्रविण भाऊ काटे, न्युज हेडलाईन्स जोगलखेडा प्रतिनिधी श्री गणेश पाटील, दिपक पाटील, योगेश चौधरी व इतर लोकांसमोर आजच्या आत्मदहनाची दखल घेवून उपस्थितां समोर दिव्यांग योगेश चौधरींना हिरवा कंदील देवून एक लेखी पञ देण्यात आले.
Home जळगाव जिल्हा अखेर ३ वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर दिव्यांग योगेश चौधरींना कासोदा ग्रामपंचायतने दिला हिरवा...










