स्व.हितेश च्या कुटुंबियांना चार लाख रुपये आर्थिक मदत मंजूर…..
पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते देण्यात आला मंजुरी आदेश देवगाव – :येथील शंकर पितांबर सोनवणे यांचा चि.स्व. हितेश शंकर सोनवणे याच विजेच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले होते.सदर कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.भाऊसो गुलाबरावजी पाटील यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या त्यानुसार शासनाकडून सदर कुटुंबाला 4,00,000रु (चार लक्ष रुपये) एवढा निधी मंजूर करण्यात आला.शासनाकडून मंजूर झालेल्या निधीचा आदेश आज पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते स्व.हितेश च्या कुटुंबियांना सुपूर्त करण्यात आला. डॉ.कमलाकर पाटील(मा.सरपंच फुपणी) यांनी कुटुंबाच्या वतीने पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले.यावेळी डॉ.कमलाकर पाटील(मा.सरपंच फुपणी),संदिप चौधरी(सरपंच किनोद),गजानन सोनवणे(नंदगाव),गजानन सपकाळे(फुपणी),पांडुरंग सोनवणे, गजानन सोनवणे(देवगाव) व ग्रामस्थांची उपस्थिती होती.












