बारावीचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

0
46

भुसावळ –  सध्या बारावीचे पेपर सुरू आहेत. दरम्यान बारावीच्या निकालानंतर अपेक्षित यश न मिळाल्याने विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत असतात. मात्र भुसावळ शहरातील समृद्धी पार्क येथे राहणाऱ्या बारावीतील विद्यार्थ्याने इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने नैराश्यातून घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

भुसावळ शहरातील समृद्धी पार्क येथे वास्तव्यास असलेला इदांत पंकज मंडलेचा (वय १७) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. यंदा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून काही दिवसांपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. यामध्ये इदांत मंडलेचा याने काही दिवसांपूर्वी बारावीचा पहिलाच इंग्रजी विषयाचा पेपर दिला होता. परंतु हा पेपर त्याला अवघड गेल्याने तेव्हापासून तो नैराश्यात होता.

दरम्यान, २७ फेब्रुवारीला इदांत याने घरी कोणी नसताना पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाइकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेबाबत रात्री भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी गणेश चौधरी तपास करीत आहेत.

Spread the love