अपक्ष उमेदवारावर दोन हल्लेखोरांकडून गोळीबार

0
25

बोदवड -: विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया चालू असल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. अश्यात बोदवड तालुक्यात अपक्ष उमेदवारावर प्रचार रॅली सुरू असतांना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी एका अपक्ष उमेदवारावर गोळीबार केल्याने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघामधून विनोद नामदेव सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान आज शिरसाळा येथील जागृती मारोती मंदीरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यानंतर त्याचा प्रचार दौरा बोदवड तालुक्यात सुरू होता. बोदवड तालुक्यातील राजूर गावात विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली सुरू असतांना कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

या घटनेमुळे बोदवड तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारमध्ये कुणालाही दुखापत झालेले नाही. दरम्यान याबाबत अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून राजकीय चर्चांना उधान आले आहे.

Spread the love