प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे या पंचकमेटी ची पहिली ग्रामसभा दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता विविध कार्यकारी सोसायटी च्या आवारात सरपंच काजल भोजराज कोळी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते . या सभेत मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे , स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हगणदारी मुक्त गाव, हर घर जल गाव घोषित करणे, मोदी आवास योजना घरकुल प्रतिक्षा यादीस मंजूरी देणे बाबत, सन २०२४/२०२५ च्या वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देणे बाबत, अध्यक्ष यांच्या परवानगीने ऐन वेळी आलेला विषयाला मंजुरी देणे बाबत अशा विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामसेविका प्रतिभा तायडे, तलाठी सुनिता वळवी, उपसरपंच एकनाथ सपकाळे, सर्व सदस्य उपस्थित होते तसेच सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. जरी या पंच कमिटी ची पहिली ग्रामसभा होती तरी अतिशय शांततेत पार पडली. घरकुल योजना यादी वाचन करण्यात आले व वाढीव नावे घेण्यात आली विशेष म्हणजे गोंभी येथील जास्तीत जास्त नागरीक उपस्थित होते.












