प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री क्षेत्र मनुदेवी मंदीराच्या प्रांगणात खान्देश लोककलावंत वही गायन मेळाव्याचे आयोजन दि. १० डिसेंबर रोजी करण्यात आले होते यावेळी खान्देश लोककलावंत विकास परिषद जळगाव चे अध्यक्ष विनोद ढगे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले प्रसंगी अध्यक्ष विनोद ढगे, पोलीस पाटील खुशाल पाटील, उपसरपंच एकनाथ सपकाळे, सुखदेव कोळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोककलावंत विकास परिषद चे अध्यक्ष विनोद ढगे यांनी शासकीय योजना विषयी माहिती दिली तसेच ग्रामीण भागातील कलाकारांमुळे अजून लोककला जिवंत असल्याचे सांगून ही लोककलची परंपरा कायम राखावी असे सांगितले. यावेळी भुसावळ तालुका वही गायन मंडळाचे तालुका अध्यक्ष सुखदेव कोळी (आंजलसोंडे) उपाध्यक्ष गलू (सुपडू) कंखरे, भगवान कोळी (वराडसिम), नंदूभाऊ मिस्तरी ( किन्ही ), राजूभाऊ धनगर (वरणगाव), उत्तम जुमळे (मुक्ताईनगर ) ,बाळू भगत (जळगाव खुर्द), सुनसगाव येथील लक्ष्मण काटे, अशोक काटे, गलू कोळी, संतोष शिरसाळे भगत, ज्ञानेश्वर खडके, जय मल्हार पार्टी वरणगाव व परिसरातील कलावंत प्रेमी नागरीक व महिला मंडळ उपस्थित होते. यावेळी गावातून वही गायन करीत मंडळाच्या कलाकारांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.












